पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुभ दिपावली

इमेज
बलिप्रतिपदा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

◆◆◆ संताची दिवाळी ◆◆◆

इमेज
●●● दिपावली ●●● ~~~~●●●~~~~     दीपावलीला आपल्याकडे अनेक शतकांची परंपरा आहे आणि संत साहित्यातही याचे उल्लेख ओघाने आलेले दिसतात. देवभक्ती आणि चांगल्या वर्तणुकीची सामान्यजनांना संथा देणा-या महाराष्ट्रातील नामवंत संतांच्या बोलांमध्ये दिवाळीचे उल्लेख जागोजागी आढळतात. दिवाळीचे फक्त चार-पाच दिवस आनंदात राहून सौजन्याने वागण्याऐवजी हा धर्म नेहमीच पाळावा, असा उपदेश संतांनी त्यांच्या साहित्यातून केलेला आहे.    दिवाळीचा लखलखाट आता बाजारात दिसू लागला आहे. घराघरांत दिवाळीच्या खरेदीची चर्चा रंगात आली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात आनंददायी आणि मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. पुराणातील अनेक कथांचा संबंध दिवाळीशी आहे. आनंद आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. या दिवाळी सणाचे प्रतिबिंब संत साहित्यात जागोजागी पडल्याचे दिसून येते. दिवाळीचा उल्लेख वारंवार आलेला असला तरी त्यात पाच दिवसांच्या दिवाळीचा जो आनंद आहे, तो केवळ तेवढयापुरता मर्यादित न राहता आपल्या जीवनामध्ये कायमची दिवाळी कशी राहील, यासाठी संतांनी त्यांच्या साहित्यातून मार्गदर्शन केल्याचे दिसते. जीवनामधील आनं

◆◆◆ शुभ दिपावली ◆◆◆

इमेज
◆◆ वसुबारस ◆◆ ~~~~~●●●~~~~~ दि. १६/१०/२०१७ सोमवार (१) ■ वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. (२) ■ या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना