◆◆◆ पोळा सण मोठा ◆◆◆

पोळा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो.
यादिवशी लोकं बैलांची पूजा करतात. आपल्यासाठी
सदैव कष्ट करणार्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो.
शेतकर्यांसाठी हा विशेष सण असून ज्यांच्याकडे शेती
नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. म्हणूनच या
सणाला बैलपोळा असे ही म्हणतात.
     या दिवशी बैलांना कामापासुन आराम असतो.
शेतकरी या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन त्यांच्या अंगाला
हिंगूळ लावतात. शिंगांना बेगड लावतात, गळ्यात सुंदर
माळा घालतात व पायात घुंगरू बांधतात. पाठीवर झुली
घालून बैलांना नान तर्हांनी सजवितात. दुपारी
पुरणपोळीचे जेवण करून ते बैलांना खाऊ घालतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी