संत मुक्ताबाई
◆◆◆ संत मुक्ताबाई ◆◆◆
~~~~~~~~~~~~~~~~
‘मुंगी उडाली आकाशी। तिने गिळले सूर्याशी।’असे लिहिणा-या मराठी संत कवयित्री आणि ज्ञानदेवांच्या धाकटय़ा भगिनी संत मुक्ताबाईंचा आज स्मृतिदिन. एके दिवशी संन्याशाची मुले म्हणून कोणी हिणवल्याने रुसून बसलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताईने खूप विनंत्या केल्या. त्याच ‘ताटीचे अभंग’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या नामदेवांचे अज्ञान उघडे पाडणारी ही मुक्ताबाई! चांगदेवांचे गर्वहरण करणारी ही मुक्ताई! ‘लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी। केले देशोधडी महान संत।’ असे उद्गार काढणारी मुक्ताबाई! अशी अनेक रूपे गाथेत येऊन जातात.
मुक्ताबाईंनी सुमारे पाऊणशे अभंग रचले. ती सर्वत्र रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आणि साक्षात्काराचे पडसाद आहेत. हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. ‘मुक्तपणे मुक्त। मुक्ताई पैं रत। हरिनाम स्मरत। सर्वकाळ’ असे म्हणणा-या ज्ञानदेवांच्या या धाकटय़ा बहिणीची समाधी खानदेशात तापीच्या काठी ‘मेहुण’ या गावी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा