◆◆◆ हरतालिका ◆◆◆

भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. पार्वतीने शंकर पती मिळावा या साठी हे व्रत केल्याचे मानले जाते. कुमारिका, महिला हे व्रतकरतात.या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत., तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. देवघरा जवळ चौरंग ठेवतात. त्याला केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित करतात. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करतात शेजारी पार्वतीची मातीची मुर्ती ठेवतात. या पद्धतीने पुजेची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. निरांजन दाखविला जातो. कुमारिकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तसेच विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून भाद्रपद शुक्ल तृतीयेस हरतालिका व्रत करण्यात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी