संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर पायी वारी दिंडी सोहळा २०१७

सुखलागीं जरी करिसी तळमळ ।
तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
तेथें अवघाची सुखरुप होसी ।
जन्मोजन्मींचें श्रम विसरसी ॥२॥
चंद्रभागेसीं करिता स्नान ।
तुझें दोष पळती रानोरान ॥३॥
लोटांगण घालोनि महाद्वारीं ।
कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥
नामा म्हणे उपमा काय द्यावी ।
माझ्या विठोबाची इडा पीडा घ्यावी ॥५॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी