नागपंचमी २७/०७/२०१७ गुरुवार

श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला नागपंचमी म्हटले जाते. या दिवशी नागाची पुजा केली जाते. फार पुर्वीपासुन आपल्याकडे नागाला देव मानून पुजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे . शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकर्याचा मित्र म्हणतात . प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पुर्वी पासून आहे . म्हणूच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते.
फार वर्षापुर्वी ‘नाग ’ वंशाचे लोक रहात होते . नंतर आर्यांचे भारतात आगमन झाले . आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार भांडणे होत . एकदा अस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली . नाग लोकांनी हा आनंद नाग पुजनाने व्यक्त केला . म्हणून नागपंचमी साजरी केली जाते, अशी एक पुराणात कथा आहे .
नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी आहे की , कृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असे. त्या नदीतील कालिया नावाच्या सापाने गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालियामर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावण पंचमीचा होता . तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी