संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर ते पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळा २०१७
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणें श्रीहरि नाहीं दुजें ॥२॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन ।
जनीं जनार्दन ऎसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा