मंगळागौर

नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. लग्नानंतर पुढील पाच वर्षे ही पूजा केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णा देवीचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई-जुई, मोगरा, गुलाब या फुलझाडांची पानेही वाहिली जातात. पूजेनंतर पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यानंतर देवीचे जागरण केले जाते. फराळ, देवीच्या आरतीनंतर पूजा करतात. रात्रभर फुगड्या, झिम्मा, बसफुगडी, पिंगा, टिपर्या, रंगीत दोर्याचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात आणि पारंपरिक गाणी म्हटली जातात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी