◆◆◆ गुरुमंत्र घेतल्यानंतर सद्गुरू जवळ कसे वागावे ◆◆◆
■ गुरुमंत्र ( अनुग्रह ) घेतल्यानंतर सद्गुरूंजवळ कसे वागावे ■
~~~~~~~~~~◆◆◆~~~~~◆◆◆~~~~~~~~
◆ सद्गुरूंशी खोटे बोलू नये .
◆ फार बोलू नये .
◆ सद्गुरूंची निंदा करू नये .
◆ सद्गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये.
◆ दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखविणारे भाषण करू नये .
◆ सद्गुरूआज्ञा मोडू नये .
◆ सद्गुरूंना प्रति उत्तर देऊ नये .
◆ सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळावी .
◆ सद्गुरूंना न आवडेल असे करू नये
◆ सद्गुरुकार्यात लौकिक इच्छ नसाव्यात .
◆ सद्गुरुकार्यात राग नसावा .
◆ सद्गुरूंच्या डोळ्यांना डोळे भिडवून कधीही बोलू नये .
◆ सद्गुरुचणांना नमस्काराशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये .
◆ सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये .
◆ सद्गुरूंसमोर हातपाय पसरून बसू नये .
◆ सद्गुरूंसमोर आळस अंगविक्षेप करू नये .
◆ जाता-येतांना सद्गुरू पादुकांना वंदन करावे .
◆ आपले काम त्यांना विचारून करावे .
◆ सद्गुरूंचे पुढून नमस्कार न करता जाऊ नये .
◆ अनवाणी जाऊन आधी गुरुगृहात वंदन करावे .
◆ सद्गुरूंसमोर आपला शिष्यसंप्रदाय मिरवू नये .
◆ सद्गूरूंशी तुम्ही या सर्वनामाने न बोलता आपण हे सर्वनाम वापरून बोलावे .
◆ सद्गुरु वंदन करून त्यांच्याजवळ बसावे .
◆ सद्गुरूंची आज्ञा घेऊन त्यांच्याजवळून जावे .
◆ सद्गुरूंच्या आज्ञेचे आदराने पालन करावे .
◆ सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते हे लक्षात ठेवावे .
◆ सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे असे लक्षात ठेवावे .
◆ गुरु मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे .
◆ सद्गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवावा .
◆ सद्गुरूंना अनन्यभावे शरण जावे .
◆ सद्गुरूंना देवापेक्षा लहान समजू नये .
◆ सद्गुरूंच्या अनुग्रहाचा विसर पडू देऊ नये .
◆ सद्गुरूंनी दिलेल्या दीक्षेचा मान राखवावा.
◆ सद्गुरूंच्या इच्छेविरुध्द त्यांच्या चरणकमलांना स्पर्श करू नये .
◆सद्गुरूंशी संवाद साधताना विशिष्ट अंतर ठेवून बोलावे .
◆◆ श्री संत सखाराम महाराज की जय !! ◆◆
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा