गोडी अभंगाची

क्षणाक्षणा हाचि करावा विचार ।
तरावया पार भवसिधु ॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळ ।
आयुष्य खातो काळ सावधान ॥२॥
संतसमागमीं धरावी आवडी ।
करावी तांतडी परमार्थी ॥३॥
तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें ।
नये डोळे धुरें भरुनि राहो ॥४॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी

◆◆ गणपतीची १०८ नावे ◆◆