चला वारीला
पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा ।
दीनाचा सोयरा पांडूरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
कृपाळु तांतडी उतावीळ ॥२॥
मागील परिहार पुढें नाही सीण ।
झालियां दर्शन एक वेळां ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं ।
बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा