गोडी अभंगाची
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी ।
आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा